Gajanan Kirtikar

Go to English Version

मा. शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेना स्थापन करुन मराठी मनात स्वाभिमानाची जी ठिणगी टाकली, तिने ज्वालामुखीचे रुप धारण केले आणि त्यातून उसळलेल्या लाव्हारसासारख्या या ठिणग्या लोकधिकारच्या चळवळीतून अधिकाधिक उडविल्या गेल्या. लोकाधिकार ही एक चळवळ आहे सकल मराठीजनांना न्याय मिळवून देणारी. त्या चळवळीच्या स्थापनेपासून आजपर्यंत ३४ वर्षे अलग न करता येणाऱ्या अनेक नावांपैकी एक नाव गजानन तथा भाऊ कीर्तिकर! भाऊंचे आणि लोकाधिकाराचे नाते इतके जवळचे, इतके अतूट की लोकाधिकाराची जडणघडण, यश, अपयश हा भाऊंचा जगण्याचाच एक भाग झाला आहे. शिवसेनेच्या विचाराने घडलेले भाऊ शिवसैनिकापासून आमदार-मंत्री-शिवसेना नेतेपदापर्यंत पोहोचले, तरी आजही त्यांच्यातील लोकाधिकार कार्यकर्ता जागा आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा एखाद्या आस्थापनांत मराठी माणसांवर अन्याय होतो, तेव्हा तेव्हा भाऊंच्यातील लोकाधिकार कार्यकर्ता जागा होऊन आंदोलनाचा झेंडा हाती घेतो.

डाऊनलोड कार्यअहवाल

डाऊनलोड ई-कार्यअहवाल


वचननामा


नोकरी संधी


मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL