[Pressnote] गुढीपाडव्यास महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ !

मुंबई : मुंबई उत्‍तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा-रिपाइं (ए)-रासप महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्‍या प्रचाराचा शुभारंभ शनिवार दि. ६ एप्रिल (गुढीपाडवा) रोजी श्री सिध्‍दीविनायक मंदिरसितानगरजयकोच जवळजोगेश्‍वरी (पूर्व) येथे सकाळी ११ वाजता संपन्‍न होणार आहे.

 महायुतीचे उमेदवार श्री.कीर्तिकर यांच्‍या प्रचाराचा शुभारंभ शिवसेना नेते व मंत्री सुभाष देसाईराज्‍यमंत्री रविंद्र वायकरसौ.विद्या ठाकूरआमदार अॅड.अनिल परब,आमदार सुनिल प्रभुआमदार अमित साटमआमदार रमेश लटकेआमदार भारती लव्‍हेकर सह रिपाईचे मुंबई उत्‍तर पश्चिम जिल्‍हाध्‍यक्ष प्रकाश जाधवरासपचे जिल्‍हाध्‍यक्ष मनिष पटेल यांच्‍या प्रमुख उपस्थितीत संपन्‍न होणार आहे. याप्रसंगी शिवसेना महिला विभाग संघटक व नगरसेविका सौ.राजुल पटेलसौ. साधना माने,भाजपा महिला मोर्चा अध्‍यक्षा श्रीमती सरीता राजपुरे तसेच शिवसेना उ‍पविभागप्रमुखसर्व नगरसेवकशाखाप्रमुखमहिला शाखा संघटकमहायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्थित राहणार आहेत.

 महायुतीचे उमेदवार श्री. कीर्तिकर यांच्‍या प्रचाराचा नारळ वाढवल्‍यानंतर जोगेश्‍वरी पूर्व विधानसभेच्‍या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन कॅनोरिटा गारमेंट हबदलवाई कंपाऊंडजोगेश्‍वरी गुंफा रोडजोगेश्‍वरी (पूर्व) येथे दुपारी १२ वाजता तर त्‍याच दिवशी सायंकाळी ७ वाजता दिंडोशी विधानसभेच्‍या निवडणूक कार्यालयाचे किशोरी निवासगाळा नं. १३हवाहीरा पार्ककुरारगांवमालाड (पूर्व)येथे उद्घाटन होणार आहे.