केंद्रीय पोस्‍ट सचिव, नवी दिल्‍ली यांना पोस्‍ट विभागाशी निगडीत समस्‍यांचे निवेदन सादर केले

मुंबईतील पोस्‍ट ऑफिस, कर्मचारी वसाहतींची दुरूस्‍ती व इतर विकास कामांसाठी निधी उपलब्‍ध व्‍हावा म्‍हणून श्री. प्रदिप्‍ता कुमार बीसोई, केंद्रीय पोस्‍ट सचिव यांची आज नवी दिल्‍ली येथील मुख्‍यालयात भेट घेऊन निवेदन सादर केले. सहार पोस्‍ट आणि टेलिग्राफ कॉलनी, अंधेरी पूर्व येथील मोडकळीस आलेल्‍या कर्मचारी वसाहतींच्‍या दुरूस्‍तीसाठी किमान रू. ३ कोटी निधीची मागणी केली. 

अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा पोस्‍ट ऑफिसची इमारत मोडकळीस आल्‍यामुळे पोस्‍ट ऑफिस हंगामी स्‍वरूपात आझाद नगर, अंधेरी पश्चिम येथे स्‍थलांतरीत केले असल्यामुळे नागरिकांना सात ते आठ कि.मी. दूरचा प्रवास करावा लागत आहे. वर्सोवा पोस्‍ट ऑफिसच्‍या जवळील सेंट्रल फिशरीज इन्स्टिट्यूटच्‍या रिकामी असलेल्‍या चार सदनिका पोस्‍ट ऑफिसला उपलब्‍ध करून देण्‍यासाठी केंद्रीय सचिव, फिशरीज विभाग यांचेकडे तसेच सातबंगला, अंधेरी पश्चिम येथे मुंबई पोलीस दलाच्‍या कर्मचारी वसाहतीमध्‍ये रिक्‍त असणा-या चार सदनिका वर्सोवा पोस्‍ट ऑफिससाठी मिळण्‍याकरिता पोलीस आयुक्‍त, मुंबई व पोलीस महासंचालक, महाराष्‍ट्र राज्‍य यांचेकडे पाठपुरावा करावा तसेच जीपीओ, मुंबई ही पुरातत्‍व वास्‍तू म्‍हणून घोषित केलेली पोस्‍ट विभागाची इमारत दुरूस्‍त करणे अत्‍यंत गरजेचे आहे. त्‍याकरिता विद्यमान आर्थिक वर्षात केंद्र शासनाने रू. ८ कोटी निधी मंजूर केला होता. परंतु कोरोनाच्‍या कालावधीत सदर निधी केंद्र शासनाने परत मागून घेतला. सदर रू. ८ कोटी निधी तात्‍काळ मंजूर करावा अशी आग्रही मागणी यांनी केली. 

श्री. प्रदिप्‍ता कुमार बीसोई, केंद्रीय पोस्‍ट सचिव, नवी दिल्‍ली यांनी याबाबत सकारात्‍मक भूमिका घेतली जाईल व जास्‍तीत जास्‍त निधी उपलब्‍ध करून दिला जाईल असे आश्‍वासन दिले.