[Pressnote] अंधेरी पश्चिम व वर्सोवा विधानसभा निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन संपन्न !

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील शिवसेना-भाजपा-रिपाइं (ए)-रासप महायुतीचे उमेदवार श्री.गजानन कीर्तिकर यांच्या गेल्या ५ वर्षातील खासदारकीच्या कार्यकाळातील कामांचा कार्यअहवाल प्रकाशन लोकसभा मुख्य निवडणूक कार्यालयशेर-ए-पंजाब कॉलनीअंधेरी (पूर्व) येथे नुकतेच पार पडले. शिवसेना नेते व मंत्री सुभाष देसाईमुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलारराज्यमंत्री रविंद्र वायकर आणि सौ.विद्या ठाकूरमहायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकरआमदार अनिल परबआमदार सुनिल प्रभुआमदार अमित साटमआमदार रमेश लटकेआमदार सौ. भारती लव्हेकररिपाइं नेते प्रकाश जाधवपुरूष व महिला विभागप्रमुख,शिवसेना-भाजपा महायुतीचे प्रमुख पदाधिका-यांच्या  उपस्थितीत कार्यअहवालाचे प्रकाशन व वाटप संपन्न झाले.

महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या अंधेरी पश्चिम विधानसभेच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन गुलमोहरजेव्हीपीडी स्कीमजुहू येथे आमदार अनिल परबआमदार अमित साटमसामाजिक कार्यकर्ते अशोक पंडितजेव्हीपीडी असोसिएशनचे अध्यक्ष परमजित घईउद्योजक किशोर खाबीयामहिला विभाग संघटक सौ.राजुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय कदमशिवसेना उपविभाप्रमुख प्रसाद आयरेशरद जाधव,संजय पवार,  युतीचे नगरसेवक उपस्थित होते. तर वर्सोवा विधानसभा क्षेत्रासाठी बेहरामबागजोगेश्वरी (पश्चिम) येथे निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी आमदार सौ. भारती लव्हेकर, उपविभागप्रमुख राजू पेडणेकरराजेश शेट्येहारून खान तसेच महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.