Gajanan Kirtikar

Go to English Version

मतदाराचा शतश: ऋणी – गजानन कीर्तिकर

मतदार बंधू भगिनींनो मन:पूर्वक धन्यवाद!

विद्यमान निवडणुकीत आपण मला भरघोस मतांनी निवडून दिलेत आपला मी ऋणी आहे!

निवडणुकीत आश्वासने देणे आणि निवडून आल्यावर त्याची पूर्तता न करणे याचा परिणाम पराजयच असतो.शिवसेना पक्षात वचननामा सादर केला जातो व आम्ही कार्यकर्ते-शिवसैनिक वचनपूर्ती करतो.निवडून आल्यावर दरवर्षी नागरिकांना-मतदारांना केलेल्या कामाचा अहवाल सादर करण्याची आमची प्रथा आहे.त्यामुळे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी सलग निवडून येतात.आदरणीय शिवसेनाप्रमुखांच्या विचाराने, शिकवणीने प्रेरित झालेले आम्ही शिवसैनिक, ८०% समाजकारण २०% राजकारण ही शिवसेना प्रमुखांची शिकवण.समाजकारण यशस्वी करण्यासाठी राजकारणाची जोड घ्यावी लागतेच.गेल्या निवडणुकीत मला परजयाला सामोरे जावे लागले होते परंतु मी सतत कार्यरत राहिलो म्हणून या निवडणुकीच्या वेळेस यश संपादन करणे शक्य झाले.१९९० ते २००९ या कालावधीत मालाड विधानसभेतून सलग चार वेळा मतदारांनी मला निवडून दिले.सेवासातत्य, जनसंपर्क , मतदारांचा विश्वास यामुळे सलग चार वेळा निवडून येणे शक्य झाले.

या निवडणुकीत आपणास दिलेल्या वचनांची मला जाण आहे.आपण भरघोस मतांनी निवडून दिल्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे.जनसेवेत मी कोणतीही त्रुटी ठेवणार नाही.माझ्या कार्याचा मी एवढा विस्तार करेन की मला मतदान केल्याचा आपणास अभिमान वाटेल.

शिवसेनापक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी ज्या पद्धतीने निवडणूक प्रचार यंत्रणा राबविली त्यांचाही मी ऋणी आहे.भाजपा-आरपीआय-राष्ट्रीय समाज पक्ष या मित्र पक्षांनीही मन:पूर्वक सहकार्य केले त्यांचाही मी ऋणी आहे.

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL