Gajanan Kirtikar

Go to English Version

अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांवर खासदार गजानन कीर्तिकर यांनी संसदेत आग्रही मागण्या.

budget-session-lok-sabha_650x400_71429518322

 

दिनांक ४ ऑगस्ट २०१६ रोजी संसदेत अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांवर चर्चा होती. शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी संसदेत अभ्यासपुर्ण व आग्रही मागण्या मांडल्या त्या खालीलप्रमाणे :-

 • अपंगांना साहित्य पुरवण्यासाठी केंद्राने राज्याला फक्त ५ कोटी ७८ लाख अनुदान दिले ते किमान ५० कोटी द्यावे.
 • दिनदयाळ अपंग पुनर्वसन योजनेत राज्यांना ९२ लाख रुपये दिले, ते किमान १० कोटी देण्यात यावेत.
 • अनुसूचित जाती जमाती विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासाठी ९८ लाख दिले, किमान १० कोटी द्यावेत.
 • बायोटेक्नोलॉजी रिसर्च प्रोग्रामसाठी ३३ लाख अनुदान दिले, त्यासाठी १० कोटीची मागणी केली.
 • मनरेगा योजनेअंतर्गत १ कोटी ३६ लाख अनुदान दिले ते २५ कोटी द्यावेत.
 • फिल्म डॉक्युमेंट्रीसाठी ६ कोटी अनुदान दिले, मराठी भाषेत डॉक्युमेंट्रीस प्राधान्य दिल्यास शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचतील म्हणून २० कोटीची मागणी केली.
 • डिजीटल योजना प्रोग्रामसाठी ३८५ कोटी व सिडॅक सेंट्रल डेवलपमेंटसाठी १५३ कोटी दिले, महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता रुपये ५०० कोटीची मागणी केली.
 • केंद्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा लक्षात घेता राज्य आपत्कालिन योजनेतील आपात्कालिन अनुदान १ हजार ११२ कोटी २५ लाख, ग्रामविकास अनुदान १ हजार ६२३ कोटी ३२ लाख व नगरविकास अनुदान १ हजार १९१ कोटी २४ लाख या तिन्ही योजनांतील अनुदानात भरीव वाढ करण्यात यावी.
 • मुंबई परिमंडळातील पोस्ट ऑफिसचे २१ रिकामे भूखंड आहेत. त्यापैकी मोतीलाल नगर, उन्नत नगर, गोरेगाव येथे तात्काळ पोस्ट ऑफिस सुरु करावी अशी मागणी केली.
 • केंद्राच्या फायर ऑडीट कमिटीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्यात ९१७ अग्निशमन केंद्रांची गरज असताना महाराष्ट्रात फक्त १५७ अग्निशमन केंद्रे आहेत. अग्निशमन केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी १०० कोटी द्यावेत.
 • प्रौढ शिक्षणासाठी फक्त ५ कोटी ७२ लाख अनुदान दिले. ते केंद्राने किमान २५ कोटी द्यावेत.
 • महाराष्ट्र राज्यात रस्त्यांची लांबी २ लाख ९९ हजार ३६८ किलोमीटर आहे. परंतु नॅशनल हायवे अॅथोरिटीनी राज्यात फक्त ७६ कोटी ६० लाखांची गुंतवणूक केली किमान ५०० कोटीची गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
 • महाराष्ट्र राज्यात मागील वर्षी ६३ हजार ८०५ रस्ते अपघातात १३,२१२ व्यक्तिंचा मृत्यू झाला. परंतु रस्ता सुरक्षा योजनेसाठी फक्त २ कोटी ४१ लाख अनुदान दिले आहेत किमान २५ कोटी देण्यात यावे.

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL