Gajanan Kirtikar

Go to English Version

हृदयशस्‍त्रक्रियेसाठी लागणारे स्‍टेंटस् फक्‍त 7 हजार रूपयात मिळणार खासदार गजानन कीर्तिकर यांच्‍या प्रयत्‍नांना यश

stent_image_for_website

 

आजच्‍या धकाधकीच्‍या जीवनशैलीत अन्‍न व भाज्‍यांमध्‍ये वापरात येणा-या खत व किटक नाशकांमुळे संपूर्ण देशात रक्‍तदाब व मधुमेहाच्या रूग्‍णांचे प्रमाण वाढत आहे. परिणामी बहुतांश रूग्‍ण हृदय विकारामुळे आजारी होत आहेत. हृदय विकाराचा झटका आल्‍यानंतर सर्वप्रथम रूग्‍णावर अॅन्‍जोग्राफी व अॅन्‍जाप्‍लास्‍टी केली जाते. बहुतांश वेळेत रूग्‍णाला स्‍टेन टाकून अॅन्‍जोप्‍लास्‍टी केली जाते. सदर एका स्‍टेनची किंमत किमान रू. 1 लाख असल्‍यामुळे इतर खर्चासहीत रूग्‍णाला अंदाजे 5 लाख रूपयांचा भुर्दंड पडतो. सदर बाब लक्षात आल्‍यानंतर खासदार गजानन कीर्तिकर यांनी केंद्रीय आरोग्‍य मंत्री ना. जगतप्रकाश नड्डा यांना दि. 13/01/2017 रोजी निवेदन सादर करुन किंमत कमी करण्‍याबाबत आग्रही मागणी केली. केंद्र सरकारच्‍या राष्‍ट्रीय औषधी मुल्‍य निर्धारण प्राधिकरणाने तात्‍काळ अधिसूचना जारी करुन स्‍टेंटच्‍या किंमती 85 टटक्‍क्‍यांनी कमी केल्‍या आहेत. नविन किंमतीनुसार नविन मेटल स्‍टेंटस् 7,260/- रूपयांना तर बीव्‍हीएस स्‍टेंटस् 29,600/- रूपयांना मिळणार आहे. त्‍यामुळे लाखो रूग्‍णांना दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय मंत्री ना. जगतप्रकाश नड्डा यांनी तात्‍काळ मागणी मान्‍य केल्‍याबद्दल त्‍यांचे आभार व्‍यक्‍त केले आहेत.

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL