Gajanan Kirtikar

Go to English Version

रेल्वे अर्थसंकल्पावर भाषण करताना मांडलेल्या मुंबई उपनगरीय रेल्वे समस्या

gajanan-kirtikar-sansad

रेल्वे अर्थसंकल्पावर दि. १४ जुलै रोजी लोकसभेत चर्चा करण्यात आली.  उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी पश्चिम उपनगरीय रेल्वे समस्यांसह इतरही अनेक समस्या सभागृहात मांडल्या. या समस्यांबाबत अर्थसंकल्पातील तरतूदींचा उल्लेख करुन विस्तृत मुद्दे मांडले. पश्चिम उपनगरातील रेल्वे स्थानकांवर अंधेरी व बोरीवली मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून बनविण्यात यावे, एमयुटीपी-२ प्रकल्पाअंतर्गत अर्थसंककल्पात १ हजार ११८ कोटी रुपयांची नव्याने तरतूद आवश्यक असताना दर्शविलेले नाही हे निदर्शनास आणले. जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकांमध्ये ओशिवरा रेल्वे स्थानक नव्याने बांधले जात आहे, त्याला होत असलेली दिरंगाई नमूद केली. तसेच येथे असणाऱ्या सिमेंट गोदावूनमुळे परिसरात होत आसलेल्या प्रदुषणाबाबतही त्यांनी निषेध नोंदविला. फलाटांची उंची वाढवण्यासाठी ८ कोटी ३८ लाख रुपये अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. त्यापैकी जास्तीत जास्त निधी उपनगरीय रेल्वेला मिळावा अशी देखील आग्रही मागणी केली. पिण्याचे पाणी, पाणी शुध्दीकरण यंत्रणा यासाठी जी तरतूद करण्यात आली आहे, ती अपूरी असल्याचे त्यांनी सांगितले.

राजस्थान, अहमदाबाद, गुजरात तसेच उत्तर भारतातून येणाऱ्या बाहेरगांवच्या गाड्या अंधेरी स्थानकावर थांबविण्याची त्यांनी आग्रही मागणी केली. अंधेरी बोरीवली रेल्वे स्थानकांवर वेंटीग रुम (प्रतिक्षालय) बांधण्याबाबत सूचना केली. चालू आर्थिक वर्षात ११ कोटी १५ लाख ९५ हजार प्रवासी पादचारी पूलासाठी तरतूद केली आहे. अंबोली, जोगेश्वरी, राम मंदिर रोड(ओशिवरा) येथे प्रवासी पादचारी पूल बांधण्यासाठी त्यांनी मागणी केली. रेल्वे फलाटांवर प्रसाधनगृह दूरुस्तीसाठी २ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, सदर तरतूद वाढविण्याची त्यांनी मागणी केली. कर्मचारी निवास, त्यांना मागणी केली कर्मचारी निवास त्यांना वैद्यकीय सवलती, प्रशिक्षण याकरिता ३७६ कोटी २१ लाख ६२ हजारांची तरतूद करण्यात आली आहे, त्याअनुषंगाने अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पूर्व, कांदिवली पूर्व येथील कर्मचारी निवासस्थाने, रस्ते ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याची सुविधा तात्काळ सुधारणा करण्याबाबत त्यांनी आग्रह धरला.

पश्चिम रेल्वे स्थानकांलगत अनेक रेल्वे जमीनींवर अतिक्रमणे झालेली आहेत. ती निष्कांचित करुन त्यावर स्वच्छतागृहे, रेल्वे पाकींग करण्यासाठी जागेचा वापर करावा अशी सूचना त्यांनी मांडली. जोगेश्वरी, गोरेगांव आणि मालाड येथून चर्चगेट करीता अतिरिक्त लोकल्स सुरू करण्याची मागणी आग्रहीपणे मांडली. अंधेरी ते गोरेगांव हार्बर लाईन विस्तारीकरणाची झालेली दिरंगाई निदर्शनास आणली.  रेल्वे कर्मचारी विकास निधी ५०० वरून ८०० करण्यात आला आहे, परंतू रेल्वेतील हंगामी कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्ष कायमस्वरुपी सेवेत समाविष्ठ केले जात नाही हेदेखील त्यांनी आवर्जून मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, परळ येथाल ४० नर्सेस गेली ८ वर्षे हंगामी तत्वावर काम करीत आहेत, त्यांनी तात्काळ कायमस्वरुपी सेवेत समाविष्ट करुन घेण्याची त्यांनी मागणी केली. बांद्रा ते बोरीवली ६ वी लाईन टाकणे अत्यंत गरजेचे असताना याबाबत रेल्वे प्रशासनाने विलंब केल्याचे त्यांनी नमूद केले. बांद्रा-वसई-दिवा जंक्सन मार्गे शिर्डी देवस्थानासाठी नविन ट्रेन सुरू करण्याची मागणी केली. तसेच कराड-चिपळूण व कोल्हापूर-सावंतवाडी नविन मार्ग टाकण्याची त्यांनी मागणी केली. महत्वाचे म्हणजे प्रवासी संख्या लक्षात घेता चर्चगेट स्थानक ते सीएसटी स्थानक दरम्यान नविन रेल्वे मार्ग टाकण्याची त्यांनी मागणी केली. चर्चगेट ते विरार एलिवेटेड ट्रेन सुरू करण्याची देखील आग्रही मागणी केली.

अत्यंत तळमळीने सदर विषय सभागृहात मांडीत असताना अध्यक्ष महोद्यांनी देखील कीर्तिकर यांनी पुरेसा वेळ उपलब्ध करुन दिला. त्यांच्या भाषणाच्या दरम्यान अनेक सदस्यांनी बाके वाजवून त्यांच्या सूचना व मागण्यांना समर्थन दर्शविले.

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL