Gajanan Kirtikar

Go to English Version

शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना एकत्र आणून वर्सोव्यातील समस्या खा. गजानन कीर्तिकर सोडविणार

versova-public-meeting

अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा कोळीवाड्याच्या समस्यांबाबत शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी जिल्हाधिकारी, मुंबई महानगरपालिका, मेरिटाईम बोर्ड, मुंबई पोर्ट ट्रस्ट, एमटीडीसी, संबंधित पोलिस अधिकारी या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संयुक्तपण चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी शुक्रवार दि. ९ जानेवारी २०१४ रोजी सकाळी १० वाजता, वर्सोवा कोळावाडा, बाजारगल्ली, समुद्रकिनारा येथे बैठक व पाहणी दौरा आयोजित केला होता.

येथील सीआरझेडच्या जाचक अटींमुळे घरांची दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करता येत नाही. परिणामी कुटूंब सदस्यांची संख्या वाढूनदेखील घरांचे आकारमान वाढवता येत नाहीत. महापालिकेचे उप मुख्य अभियंता यांनी राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येईल असे सांगितले. बंदरावरील घाऊक मासे खरेदी-विक्रीसाठी आवश्यक असणारी शेड बांधण्याकरिता व आवश्यक त्या ठिकाणी शौचालये बांधण्याकरिता खासदार निधी उपलब्ध करुन देईन असे आश्वासन खा. गजानन कीर्तिकर यांनी दिले. त्याकरिता जिल्हाधिकारी आवश्यक ती परवानगी तात्काळ देणार आहेत.  वर्षानुवर्षे मासळी सुकविण्याचे भूखंड नावावर झालेले नसल्यामुळे मच्छिमार बांधव आपल्या हक्कांपासून वंचित आहेत. त्यांचे पात्रतेचे पुरावे सादर केल्यानंतर पडताळणी करुन ७/१२ वितरीत करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे तहसीलदार अंजली पवार यांनी सांगितले. वर्सोवा किनाऱ्यावर पर्यटनाच्या दृष्टीने विविध उपक्रम सुरु करणेबाबत विस्तृत आराखडा तयार करुन त्याकरिता आवश्यक असणारा भूखंड शासनाकडे मागणी करण्यात येईल असे एमटीडीसीचे श्री. आर. डी. पवार यांनी सांगितले.

सागरकुटीर व इतर किनाऱ्यावरील वसाहतींमध्ये येणारा समुद्राचे पाणी अडविण्यासाठी त्रिकोणी आकाराचे मोठे सिमेंट बोल्ट टाकण्यात येतील असे जिल्हाधिकारी कार्यालय प्रतिनीधीने सांगितले. किनाऱ्यावरील वाळू चोरांविरुध्द कारवाई करण्यासाठी विशेष गस्ती पथक नेमणार असल्याचे आश्वासन पोलीस विभागाने दिले. किनाऱ्यावरील तिवरांच्या संवर्धनासाठी विशेष निधी उपलब्ध होण्याकरिता याबाबतच्या समितीकडे प्रस्ताव सादर करुन निधी मंजूर करुन घेण्यात येईल असे तहसिलदार श्री. पवार यांनी सांगितले. फिश गोडावूनसाठी आरक्षित भूखंडावरील अतिक्रमण हटविणे व किनाऱ्याकडे जाणारे रस्ते, गल्ल्या दुरुस्त करणे आणि बस डेपो ते किनारा नविन मार्ग उभारण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे महापालिकेचे उपायुक्त श्री. बालमवार यांनी सांगितले.

डिझेलच्या करातील परतावा, बर्फ कारखान्याला वीज बीलात सवलत, कोळी बांधवांना जातीचे दाखले, वर्सोवा मढ जेट्टी दुरुस्ती, वर्सोवा खाडीतील गाळ उपसणे याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन विशेष निधी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे, एका शिष्टमंडळांसह खासदार गजानन कीर्तिकर दिल्ली येथे १५ दिवसात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार आहेत.

 

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL