Deprecated: mysql_connect(): The mysql extension is deprecated and will be removed in the future: use mysqli or PDO instead in /home/gajanank/public_html/wp-includes/wp-db.php on line 1142
अर्थसंकल्प २०१७-१८ असमाधानकारक – गजानन कीर्तिकर | Senior Shivsena Leader Gajanan Kirtikar | Member of Parliament from North West Mumbai

Gajanan Kirtikar

Go to English Version

अर्थसंकल्प २०१७-१८ असमाधानकारक – गजानन कीर्तिकर

Budget 2017 year on cube with pencil and clock

विद्यमान अर्थसंकल्प नोटबंदीनंतरचा आहे त्यामुळे देशातील मध्यमवर्गीय व दुकानदार, व्यावसायिक व लघुउद्योजक यांना किमान कररचनेमध्ये सवलत मिळायला हवी होती ती मिळाली नाही, अर्थसंकल्प हा पुर्णतः असमाधानकारक आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांनी अर्थसंकल्प २०१७-१८ वर बोलताना दिली.

देशातील कृषी, दलित व ग्रामीण जनतेला आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून केलेल्या आर्थिक तरतूदीमुळे त्यांच्या जीवनमानात फरक पडलेला नाही. रस्ते बांधकाम, इन्फ्रास्ट्क्चर, रेल्वे, समुद्रमार्ग याला देखील भरघोस तरतूद केलेली असून त्यांच्या भाड्यामध्ये सामान्य जनतेला भाडे सवलत मिळवण्याची गरज भागवता येईल का? टोलवरचा कर सर्वत्र चालू आहे तो बंद होणार का? असे प्रतिप्रश्न ही खासदार कीर्तिकर यांनी उपस्थित केले. मध्यमवर्गीयांना कार्यालयीन कर्मचाऱ्यांना विशेषतः केंद्र व राज्यशासन कर्मचाऱ्यांना सातव्या वित्तआयोगाच्या शिफारसीनुसार मिळणारे उत्पन्न लक्षात घेता ३ लाखाऐवजी किमान ५ लाखापर्यंत करमुक्त करण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांना मिळालेला वाढीव पगार कर भरण्यातच जातो. पहिल्या ३ स्लॅबमध्ये ५० टक्के कर कपात करण्यात यावी.

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL