Gajanan Kirtikar

Go to English Version

माझं गाव – शिर्दे दापोली

Shirde Dapoli House

नोकरी उद्योग व्यवसायासाठी मुबंईत येऊन राहिलेली अनेक मराठी कुटुंबे होळी-गणपती सणाच्या निमित्ताने, नाहीतर मे महिन्यात आपल्या गावी जात असतात.पण गावच नसल्यामुळे आम्हाला मुबंईतच राहावे लागत असे.आजूबाजूला राहणारी कुटुंबे निघाली का मला गाव नसल्याचे जाणवयाचेय.

मी रिझर्व्ह नोकरीला लागलो आणि १९८८ साली अप्पा डेपोलकर आणि बंधू सार्दळ यांच्याबरोबर मी कोकणात दापोलीजवळच्या शिर्दे गावात जागा पाहायला गेलो.अवतीभवती हिरवीगार शाल पांघरून उभे असलेले डोंगर नैसर्गिक सौंद्याने नटलेला परिसर, खळखळ वाहणाऱ्या नदीची सोबत आणि आंबा, फणस, काजू-नारळी पोफळीच्या झाडांच्या दाट बागयती.त्या मनमोहक दर्शनाने मी भारवून गेलो. अप्पा आणि बंधू मला शिर्द्याची जमीन खरेदीकरता मार्गदर्शन केले. तिथे असलेले पूर्वीच्या मालकांचे घर मी दुरूस्त करून घेतले.हक्काचे गाव मिळाल्याचा खूपच आनंद झाला. माझी बागकामाची इच्छा पूर्ण झाली. मनाला शांती आणि समाधान देणाऱ्या त्या बागेला मी नाव दिले ‘चंद्रप्रभा वनराई’. मदन बगाडे आणि भावेश धामणे बागेची देखभाल अगदी चोखपणे करीत असतात.

कोकणातील महाबळेश्वर म्हणून दापोली प्रसिद्ध आहे. नदीचा सहवास लाभलेला सारा परिसर डोंगरदऱ्यांनी वेढलेला आहे. हर्णे-दाभोळच्या सागरकिनाऱ्यांनी या भागाला सौंद्याचे वेगळे परिमाण दिले आहे. शिर्द्याला जागा घेतल्याचा आनंद माझ्याबरोबर  माझ्या कुटुंबीयांनाही झाला.

शिर्दे गावी वारंवार जात असल्यामुळे गावतील गावकऱ्यांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले असून दिवसेंदिवस हा ऋणानुबंध वाढतच चालला आहे.“आपल्यापैकीच एक” म्हणून गावकरी माझ्याकडे पाहतात, माझ्याशी चांगले वागतात.त्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळते. मीही त्यांच्या अडीअडचणीला भावून जातो, त्यांच्या अडचणी सोडवितो. शिर्देकरांसाठी काम करताना मला वेगळे समाधान मिळते.

‘चंद्रप्रभा वनराई’ची देखभाल गावातील मंडळी करतात.वनराईमुळे बेरोजगार तरूणांना आणि महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL