Gajanan Kirtikar

Go to English Version

मि. वर्ल्डची ‘कीर्ती’ वाढणार! क्रीडाप्रेमी कीर्तिकरांमुळेच मि. वर्ल्डचे यजमानपद मुंबईला

गजानन कीर्तिकर अगदी सुरुवातीपासून क्रीडा क्षेत्राशी जोडलेले आहेत, त्यामुळे राजकारणात असताना क्रीडाक्षेत्राला जमेल त्या पध्दतीने मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. बुधवार दिनांक १९ नोव्हेंबर २०१४ च्या ‘सामना’ मध्ये आलेली ही बातमी जशीच्या तशी देत आहोत. ‘सामना’च्या संकेतस्थळावर हीच बातमी वाचण्यासाठी http://www.saamana.com/2014/November/19/Link/Krida2.htm या लिंकवर जा.

————————————————————

IBBF

केरळला होणार्‍या ‘मि. वर्ल्ड’ आयोजनाबाबत केरळ सरकारने असमर्थता दर्शवल्यानंतर इंडियन बॉॅडीबिल्डर्स फेडरेशन अडचणीत सापडली होती. मि. वर्ल्ड आयोजित करायचीच आहे, पण नेमकी कुठे करायची असा प्रश्‍न त्यांना पडला होता. आयोजनासाठी मुंबई सर्वोत्तम पर्याय होता, पण इथे स्पर्धा आयोजित करायची म्हणजे मोठं खर्चिक काम. फेडरेशनला आयोजनाचा खर्च परवडणारा नव्हता म्हणून ते पुण्यासाठी राजी झाले. स्पर्धेच्या तारखाही निश्‍चित केल्या. मग त्यांना मि. वर्ल्ड आयोजनासाठी आश्रयदात्याची गरज होती आणि त्यासाठी ते शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकरांच्या भेटीला गेले. फेडरेशनला फक्त कीर्तिकरांचे पाठबळ हवे होते, पण या क्रीडाप्रेमी खासदारांनी तुम्ही मि.वर्ल्ड मुंबईतच का घेत नाही? मी तुम्हाला सर्वार्थाने पाठबळ देतो असा शब्द कीर्तिकरांकडून मिळताच पुण्याची मि. वर्ल्ड आपोआप मुंबईत आली.

हिंदुस्थानने मि. वर्ल्ड निसर्गरम्य केरळमध्ये घ्यायचे ठरवले होते. स्पर्धेची पूर्ण जबाबदारी केरळ सरकारने उचलण्याची तयारी दर्शवल्यामुळे फेडरेशन निश्‍चिंत होती, पण स्पर्धेचा कालावधी जवळ आल्यावर केरळ सरकारकडून कोणतीही हालचाल होत नसल्याचे निदर्शनास येताच पाठारे यांना आयोजनाची जबाबदारी पार पाडण्यासाठी मि. वर्ल्ड पुण्यात खेळविण्याचा निर्णय घ्यावा लागला.

मि. वर्ल्डचा किमान खर्च तीन कोटींच्या घरात होता आणि फेडरेशनने त्यादृष्टीने जमवाजमवही सुरू केली होती. स्पर्धेसाठी पैसा उभारण्यासाठी त्यांना मुंबईकडूनच अपेक्षा होती. मि. वर्ल्डसाठी कोण आपल्याला पाठबळ देऊ शकतो यासाठी फेडरेशनकडून चाचपणी सुरू होती. फेडरेशनला गरज होती खर्‍याखुर्‍या आश्रयदात्याची आणि त्यांनी साकडे घालण्यासाठी शरीरसौष्ठवावर उदंड प्रेम करणार्‍या गजानन कीर्तिकरांकडे धाव घेतली. इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनच्या चेतन पाठारे, विक्रम रोठे, सुनील शेगडे, राजेश सावंत, विजय झगडे यांनी कीर्तिकरांची भेट घेतली. ते मोठ्या अपेक्षेने कीर्तिकरांना मि. वर्ल्डचे महत्त्व पटवून देत होते. पण कीर्तिकर त्यांच्यावर नाराज झाले. म्हणाले, मला किमान एकदा विचारायचे तरी ! मी असताना तुम्ही मि. वर्ल्डसाठी पुण्याचा विचार तरी कसा केला…? तुम्हाला काय हवंय ते फक्त सांगा. पुण्यापेक्षा दिमाखदार आयोजन मुंबईत करू. तुम्ही मि. वर्ल्ड मुंबईत घ्या, तुम्हाला सर्व बळ देतो. तुम्ही कसलीही चिंता करू नका. दिलेल्या शब्दाला जागणारे असा लौकिक असलेल्या गजानन कीर्तिकरांकडून ‘शब्द’ मिळताच फेडरेशनच्या पदाधिकार्‍यांच्या अंगावर अक्षरश: शहारे उभे राहिले. कीर्तिकरांचा लौकिक म्हणजे भव्यदिव्य आयोजन. आता आपली मि. वर्ल्ड अत्युच्च दर्जाची होणार असा विश्‍वास फेडरेशनमध्ये दिसू लागला. कीर्तिकर नुसते ‘शब्द’ देऊन थांबले नाही तर त्यांनी स्पर्धेच्या सर्व सुविधा ‘फाइव्हस्टार’ केल्या. एवढेच नव्हे तर मि. वर्ल्डला कॉर्पोरेट जगताचेही बळ लाभावे म्हणून ते प्रयत्नशील आहेत. आता त्यांचे पाठबळ मि. वर्ल्डसाठी परिसस्पर्श ठरेल यात वाद नाही.

कीर्तिकर जैसा कोई नहीं

मोठमोठ्या स्पर्धा आयोजित करणारे तुम्ही अनेक पाहिले असाल, पण एक राज्यस्तरीय स्पर्धा सुनियोजित पार पाडण्याबरोबरच स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल ७५ लाखांचा निधी कबड्डी संघटनेसाठी संकिर्ंिलत करणारे गजानन कीर्तिकर हे एकमेव संघटक होत. मुंबई उपनगर कबड्डी संघटनेचे अध्यक्ष होताच त्यांनी राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद स्वीकारले आणि राज्य अजिंक्यपद स्पर्धा अशीही आयोजित करता येते हे सार्‍या देशाला दाखवून दिले. याच स्पर्धेमुळे उपनगर जिल्हा कबड्डी संघटनेने सर्वात श्रीमंत जिल्हा म्हणून लौकिक मिळविला.

मि. वर्ल्डला देणार पाच कोटींचे बळ

मी आमदारही नव्हतो आणि खासदारही नव्हतो तरीही राज्य अजिंक्यपद स्पर्धेला अडीच कोटींचा निधी एकट्याने उभारला आणि न भूतो न भविष्यति अशी स्पर्धा आयोजित केली. आता तर मी खासदार आहे. ही विश्‍व स्पर्धा आहे. मि. वर्ल्डसाठी किमान पाच कोटी उभारण्याचा माझा प्रयत्न असेल. स्पर्धेचे आयोजन निश्‍चितच अत्युच्च दर्जाचेच असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून शरीरसौष्ठवपटूंच्या कल्याणासाठी अभिमानाने छाती फुगेल असा निधी उभारण्याचा मानस असल्याचे कीर्तिकर म्हणाले.

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL