Gajanan Kirtikar

Go to English Version

जोगेश्‍वरी-चर्चगेट लोकल सुरू करण्‍याच्‍या मागणीसाठी रेल्‍वे प्रवाशांसाठी स्‍वाक्षरी अभियान

MP Gajanan Kirtikar organized Signature Campaign to start Jogeshwari-Churchgate  Local Train

मुंबई उत्‍तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली जोगेश्‍वरी-चर्चगेट लोकल सुरू करण्‍याच्‍या मागणीसाठी आज दि. 04/07/2016 रोजी सकाळी 07 ते सायंकाळी 07 वा. या वेळेत शिवसेना पक्षाच्‍या वतीने जोगेश्‍वरी पूर्व विधानसभा व वर्सोवा विधानसभा क्षेत्र आयोजित जोगेश्‍वरी रेल्‍वे स्‍थानक पूर्व व पश्चिम बाजूस जोगेश्‍वरी रेल्‍वे प्रवाशांसाठी स्‍वाक्षरी अभियान राबविण्‍यात आले.

जोगेश्‍वरी-चर्चगेट लोकल सुरू करावी अशी जोगेश्‍वरीकरांची अनेक वर्षांची मागणी आहे. बोरीवली येथून चर्चगेटच्‍या दिशेने सुटणा-या लोकल्‍समध्‍ये जोगेश्‍वरीतील प्रवाशांना चढणे देखील कठीण होते. मालाड व गोरेगांव येथून सुटणा-या लोकल्‍सच्‍या प्रमाणेच जोगेश्‍वरी येथून किमान 4 लोकल्‍स नव्‍याने सुरू करण्‍यात याव्‍यात या मागणीसाठी ही स्‍वाक्षरी मोहीम राबविण्‍यात आली. संपूर्ण दिवस सुरू असलेल्‍या या स्‍वाक्षरी मोहीमेस प्रवाशांचा उत्‍फुर्त प्रतिसाद लाभला. सदर स्‍वाक्ष-यांचे निवेदन खा.श्री.कीर्तिकर हे मुंबईतील अन्‍य खासदारांसह केंद्रीय रेल्‍वे मंत्री श्री.सुरेश प्रभू यांना आगामी संसदेच्‍या अधिवेशनात सादर करुन जोगेश्‍वरी लोकलचीपरत एकदा आग्रही मागणी करणार आहेत.

याप्रंसगी खासदार गजानन कीर्तिकर यांनी प्रथम स्‍वत: स्‍वाक्षरी करुन या मोहीमेचा प्रारंभ केला. यावेळी स्‍थानिक आमदार व राज्‍यमंत्री श्री.रविंद्र वायकर, विभाग प्रमुख - आमदार सुनिल प्रभु, महीला विभाग संघटक राजुल पटेल, उप विभाग प्रमुख - नगरसेवक राजु पेडणेकर, विश्‍वनाथ सावंत, अनंत भोसले, विष्‍णु कोरगावकर, राजेश शेट्ये, नगरसेवक बाळा नर, जितेंद्र वळवी, मंजीरी परब, . उप विभाग संघटक शालीनी सावंत, रचना सावंत, अग्‍नेस फर्नांडीस, विना टाक, तसेच जोगेश्‍वरी व वर्सोवा विधानसभा क्षेत्रातीलस सर्व शाखाप्रमुख, . शाखा संघटक, व्‍यापारी सेना, ग्राहक संरक्षण कक्ष, युवा सेना पदाधिकारी, शिवसैनिक, नागरीक, प्रवासी उपस्थित होते.

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL