Gajanan Kirtikar

Go to English Version

निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करा – खा. गजानन कीर्तिकर

दिनांक ३० नोव्हेंबर २०१६ रोजी संसदेच्या शुन्य प्रहरात शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी मागिल अनेक वर्षांपासून खंडीत असलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवाढीच्या मुद्द्याला हात घातला. खासदार श्री. गजानन कीर्तिकर हे स्वतः बँकींग क्षेत्रातील असून ते सध्या देशातील विविध बँक कर्मचारी संघटनांचे नेतृत्व करीत आहेत. देशातील वाढती महागाई, औषधोपचार व प्रवासखर्च लक्षात घेता निवृत्त बॅंक कर्मचाऱ्यांना मिळणारे पेन्शन अतिशय तुटपुंजे आहे. विद्यमान कर्मचाऱ्यांना ज्या निकषावर महागाई भत्ता दिला जातो त्याच धर्तीवर पेन्शनमध्येही वाढ करणे गरजेचे आहे. बँक एम्प्लॉईज पेन्शन अधिनियम १९९५ मध्ये तशी तरतूद असताना देखील वाढीव महागाई भत्त्यानुसार पेन्शन दिले जात नाही. अनेक वर्षांपासून रखडलेल्या कर्मचारी पेन्शनच्या मुद्द्याला हात घातल्याने उपस्थित सदस्यांनीही श्री. कीर्तिकर यांच्या मागणीचे बाक वाजवून समर्थन केले.

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL