Gajanan Kirtikar

Go to English Version

आयात औषधे व वैद्यकीय उपकरणे यांच्या भरमसाठ किंमती रोखण्यात याव्यात – खा. गजानन कीर्तिकर

 

Imported Medicine Price Hike Issue raised by Gajanan Kirtikar

परदेशातून आयात होणारी औषधे, वैद्यकीय उपकरणे यांच्या भरमसाठ किंमती आकारण्यात येतात. याबाबत मा. खासदार गजानन कीर्तिकर यांनी अतारांकित प्रश्न क्र. १४५१, दिनांक २ डिसंबर २०१४ अन्वये प्रश्न मांडला. सदर वस्तुंची आयात किंमत व एमआरपी यामध्ये मोठी तफावत असते, विशेषतः महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय विमानतळ व बंदर असल्यामुळे येथील व्यापाऱ्यांकडे आवक जास्त असते. या वाढीव किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती गठीत केली असल्याची माहिती मा. मंत्री केमीकल व फर्टीलायझर श्री. अनंतकुमार यांनी सभागृहात सादर केली.

मा. डॉ. व्ही. एम. कट्टोच, सचिव, स्वास्थ अनुसंशोधन, नवी दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली मा. आयुक्त, अन्न व प्रशासन, महाराष्ट्र शासन व इतर केंद्रिय स्वास्थ्य विभागाचे सदस्य असतील.

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL