Gajanan Kirtikar

Go to English Version

बाळासाहेबांची पहिली भेट

balasahebanchi-thap-1st-jan-2014

मी रिझर्व्ह बँकेत कामास लागलो तेव्हा रिझर्व्ह बँकेतील मराठी माणसाची परिस्थिती दयनीय होती. दाक्षिणात्य कर्मचारी बहुसंख्येने होते. कर्मचारी नेतेही दाक्षिणात्य होते व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्येही दाक्षिणात्यांचाच वरचष्मा होता. यामुळे चोहोबाजूंनी मराठी माणूस पिचला जात होता.या पिचक्या कण्याला एकच व्यक्ती शक्ती देऊ शकत होती, ती म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे.त्या वेळी रिझर्व्ह बँकेत 800 जणांची भरती होणार होती. दाक्षिणात्यांचा त्यांच्याच भाईबंदांना घ्यायचा विचार चालू होता. त्यासाठी ते प्रयत्न देखील करत होते.त्या वेळेस शिवतीर्थावरील  शिवसेनेचा दसरा मेळावा फक्त 8 दिवसांवर येऊन ठेपला होता.

तेव्हा आम्हाला वाटले की, माननीय बाळासाहेबांनी दसरा मेळाव्यातील त्यांच्या भाषणात रिझर्व्ह बँकेतील मराठी माणसावरील अन्यायाला वाचा फोडावी. रिझर्व्ह बँकेच्या दाक्षिणात्य मुजोर व्यवस्थापनाला इशारा द्यावा. हे बाळासाहेबांना सांगण्यासाठी मी, रामराय वळंजू, सूर्यकांत महाडिक, अरूण जोशी, त्यांच्या निवासस्थानी ‘मातोश्री’ येथे गेलो. माझी मातोश्रीमधली बाळासाहेबांबरोबरची ती पहिली भेट.

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL