Gajanan Kirtikar

Go to English Version

वनक्षेत्रातील पात्र झोपडीधारकांना सुविधा व कायम पुनवर्सन

संजय गांधी राष्टीय उद्यान बोरिवली मुंबई येथील ६१ हजार झोपड्यांविरुध्द निष्कांचनाची कारवाई करण्याचे निर्देष मा. उच्च न्यायालयाने १९९७ साली दिले. या झोपडपट्टीधारकांचे पुनवर्सन करण्यास महाराष्ट्र शासन अपयशी ठरले आहे. २६ हजार पात्र झोपडपट्टीधारकांपैकी फक्त ११ हजार झोपडपट्टीधारकांचे पुनवर्सन केले आहे. उर्वरित १५ हजार झोपडपट्टीधारक गेली १५ वर्षे पुनवर्सनाच्या प्रतीक्षेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातच वास्तव्य करीत आहेत. शासनाने विज-पाणी-शौचालय या मुलभूत नागरी सुविधा देखील खंडीत केल्या आहेत. उर्वरित १५ हजार पात्र झोपडपट्टीधारकांच्या पुनवर्सनासाठी महाराष्ट्र शासनाकडे भूखंड उपलब्ध नाही. परिणामी येथील नागरिकांना प्रचंड हाल अपेष्टा भोगाव्या लागत आहेत. मानवतेच्या दुष्टीने व कायद्याने य रहिवाश्यांना केंद्र व राज्य शासनाने मदत करणे बंधनकारक आहे.

पत्रव्यवहार >>

मुख्य वनक्षेत्र अधिकाऱ्यांना सध्याची वस्तुस्थिती माहिती. दिनांक : २४ मे २०१४

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL