Deprecated: mysql_connect(): The mysql extension is deprecated and will be removed in the future: use mysqli or PDO instead in /home/gajanank/public_html/wp-includes/wp-db.php on line 1142
संसदेत वने आणि पर्यावरण विभागाच्या चर्चेत सहभाग | Senior Shivsena Leader Gajanan Kirtikar | Member of Parliament from North West Mumbai

Gajanan Kirtikar

Go to English Version

संसदेत वने आणि पर्यावरण विभागाच्या चर्चेत सहभाग

borivali forest

अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागण्या मतदान वेळीस वने आणि पर्यावरण विभागाच्या चर्चेच्या वेळी लोकसभा खासदार गजानन कीर्तिकर यांनी मागण्या केलेले खालील विषय पटलावर ठेवले.

१) मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्पास गेली अनेक वर्षे केन्द्राच्या वन विभागाकडून मंजुरी मिळण्यास होत असलेली दिरंगाई.

२) मुंबई सीआरझेड हद्दीतील मोडकळीस आलेल्या इमारतींची पुर्नबांधणी, कोळीवाडे आणि गांवठाण यांचा विकास, नविन विकास आराखडा तयार करणे, विकास नियंत्रण नियमावलीमध्ये सीआरझेड व गैर सीआरझेड क्षेत्रांबाबत दुरुस्ती करणे. याबाबत मा. अध्यक्ष, लोकसभा स्थायी समिती, वने व पर्यावरण ९/१०/२०१३ रोजी मुंबई येथे भेट दिली. त्या वेळेस मुंबई महापालिकेत प्रशासनाने सदर बाब निर्दशनास आणली. त्यांनी तात्काळ निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले, अद्याप कार्यवाही नाही.

३) विद्युत निर्मिती प्रकल्प, गरगाई, ता. वाडा, जि. ठाणे हा प्रकल्प मुंबई महानगरपालिका उभारत आहे. केन्द्राच्या पर्यावरण व वने विभागाने ना हरकत प्रमाणपत्र देण्यास अनेक वर्षे दिरंगाई केली आहे.

४) मिठीनदी रुंदीकरण प्रकल्पाअंतर्गत धारावी, वैतरणा पाईपलाईन, तानसा पाईपलाईन, माहीम कॉजवे येथील ब्रीज रुंदीकरण व नव्याने ब्रीज बांधण्यासाठी केन्द्राच्या पर्यावरण विभागाने ना हरकत प्रमाणपत्रक देण्यास दिरंगाई केली आहे.

५) मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त उपक्रमातून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथे १२० एकर क्षेत्रात प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्यास केन्द्राच्या वन्यजीव संरक्षण खाते (वन खाते) यांनी ना हरकत प्रमानपत्र दिलेले नाही.

६) मिठागरांच्या जमिनी नापिक पडीत आहेत, त्याबाबत निर्णय घेणे.

७) नरिमन पॉईंट-हाजीअली(वरळी)-बान्द्रा-वर्सोवा-मढ-बोरीवली हा ३५ उपनगरांना जोडणारा सागरी महामार्ग मुंबई महानगरपालिका स्वखर्चाने विकसीत करणार आहे. त्याकरिता सीआरझेड कायद्याच्या विद्यमान नियमावलीत अंक्षतः फेरबदल करण्याबाबतचा प्रस्ताव केन्द्र शासनाकडे प्रलंबित आहे. त्यास तात्काळ मंजुरी देणे.

८) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली, मुंबई यांच्या अखत्यारीत मालाड-बोरीवली-दहिसर या परिसरात ४० वर्षांपासून वास्तव्यात असणाऱ्या पात्र झोपडपट्टी धारकांचे निष्कांचन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. सुमारे २६ हजार पात्र झोपडपट्टीधारकांपैकी फक्त ११ हजार झोपडीधारकांचे पुनर्वसन झाले. उर्वरीत १५ हजार पात्र झोपडीधारक पुनर्वसनापासून वंचित राहिले आहेत. त्यांचे तात्काळ वन विभागाने पुनर्वसन करणेबाबत.

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL