Gajanan Kirtikar

Go to English Version

नागरी वाहतुक (अॅव्‍हीएशन) व पर्यटन विभागाच्‍या पुरवणी मागण्‍यांचे वेळी काल संसदेत शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी विस्‍तृत मागण्‍या सादर केल्‍या.

Air_India_Building

एअर इंडिया व इंडियन एअरलाईन्स यांचे सन 2007 साली विलीनीकरण झाले. त्‍यामधील करारानुसार एअर इंडियाचे मुख्‍यालय नरिमन पॉईंट येथेच राहणार होते. कराराचे उल्‍लंघन करुन एअर इंडियाचे मुख्‍यालय दिल्‍ली येथे स्‍थलांतरीत करण्‍यात आले. त्‍याचा निषेध करुन एअर इंडियाचे मुख्‍यालय मुंबई येथेच ठेवण्‍यात यावे अशी मागणी केली. एअर इंडियाची उप कंपनी एअर इंडिया एअर ट्रान्‍सपोर्ट सर्विस लिमिटेड सन 2003 साली स्‍थापन करण्‍यात आली. आजमितीस अंदाजे 5000 कर्मचारी आहेत. त्‍यांना सापत्‍न वागणूक देण्‍यात येत आहे. जुने युनीफॉर्म देण्‍यात येतात. सेफ्टी शूज, रेनकोट दिले जात नाहीत. एअर इंडियाची कर्मचारी निवासस्‍थाने रिक्‍त असून देखील या कर्मचा-यांना दिली जात नाहीत. कुशल कामगार असतांना देखील तुटपुंजे वेतन दिले जाते. किमान वेतन कायद्यानुसार गेल्‍या सहा महिन्‍यांपासून वेतन देण्‍यात येऊ लागले. त्‍यासाठी कामगारांना लढा द्यावा लागला. वेतनाचा पुर्नविचार करणे गरजेचे आहे. या कंपनीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कॅप्‍टन अे.के.शर्मा कर्मचा-यांशी उध्‍दटपणे वर्तन करतात. कर्मचा-यांच्‍या प्रतिनिधींशी वाटाघाटी न करता सापत्‍न वागणूक देतात. त्‍यांची या पदावरुन हकालपट्टी करुन नविन मुख्‍य कार्यकारी अधिकारी नेमण्‍यात यावा अशीही आग्रही मागणी गजानन कीर्तिकर यांनी केली.

एअर इंडियाच्‍या दैनंदिन कामकाजाबाबतही अनेक त्रुटी निदर्शनास आणल्‍या. ड्रीमलायनर विमानाची दुरूस्‍ती मुंबईमध्‍ये होते परंतु सर्व उड्डाणे दिल्‍ली येथून होतात त्‍यामुळे होणारा तोटा मुंबई येथून अनेक परदेशी उड्डाणे थेट न जाता दिल्‍ली मार्गे जातात. अनेक परदेशी विमान कंपन्‍या मुंबई येथून थेट उड्डान करतात. त्‍यामुळे प्रवासी एअर इंडिया ऐवजी परदेशी विमान कंपन्‍यांकडे आ‍कर्षित होतात. केबीन क्रू (पर्सर-एअर होस्‍टेस) 600 पदे रिक्‍त असल्‍यामुळे कर्मचा-यांवर कामाचा ताण पडत आहे. मुंबईतील सुरक्षा अधिका-यांची दिल्‍ली येथे नियमबाह्य पध्‍दतीने बदली करण्‍यात आली आहे. त्‍यांना परत मुंबई येथे नियुक्‍त करावे अशीही मागणी केली. अनेक निवृत्‍त अधिका-यांना कंत्राट पध्‍दतीने नियुक्‍त करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे सेवेत असणा-या कर्मचा-यांना पदोन्‍नती पासून वंचित रहावे लागत आहे. अशा सर्व कंत्राटी निवृत्‍त अधिका-यांना सेवामुक्‍त करुन विभागातील कर्मचा-यांना पदोन्‍नती द्यावी अशीही मागणी केली. एअर इंडिया एअर ट्रान्‍सपोर्ट सर्विस लिमिटेड मधील कर्मचा-यांवर होत असलेला अन्‍याय दूर करण्‍यासाठी एअर इंडिया मधील उच्च अधिका-यांची समिती नेमून कार्यवाही करावी. या आस्‍थापनेतील 5000 कर्मचा-यांचा उद्रेक झाला आणि संप केला तर एअर इंडियाचे एकही उड्डाण होणार नाही असा गंभीर इशाराही श्री. कीर्तिकर यांनी दिला.

जुहू विमानतळ, मुंबई येथील 29 एकर जमिनीवर अंदाजे 16 हजार झोपडपट्टीधारक आहेत. त्‍यांचे देखील पुनर्वसन करावे. यामुळे रिक्‍त होणा-या भुखंडावर जुहू विमानतळाचे विस्‍तारीकरण करणे शक्‍य होईल अशी आग्रही मागणी केली.

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL