Gajanan Kirtikar

Go to English Version

शिवसेना पक्ष

shivsena-pakshमहाराष्ट्र हे मराठी माणसांचं राज्य आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी. परंतु मुंबईत मराठी माणूस अपमानित जिणं जगत होता. १९६१ च्या शिरगणतीनुसार मुंबईतला मराठी टक्का कमी झाला होता. शहरात बिगर मराठी लोकांचं प्रमाण ५७ टक्क्यांहून आधिक इतकं झालं होतं. हा अ-मराठी टक्का सरकारी नोकर्‍यांवर खुलेआम डल्ला मारत होता. तत्कालीन काँग्रेस पुढार्‍यांना मुंबईची आणि मुंबईतल्या मराठी माणसाची पर्वा नव्हती. या नेतेमंडळींचं सगळं राजकारण ग्रामीण महाराष्ट्रात रुजलं, फोफावलं होतं. मराठी मन अस्वस्थ होतं. या विषयावर मार्मिक चं कॅम्पेन तुफान होतं.बाळासाहेबांचे दौरे सुरु होते. व्याख्यानं, सभा असा त्यांचा तडाखेबंद कार्यक्रम असायचा. विचारांचा जाळ पेटला होता. चळवळीचा व्याप तर वाढतच होता. संघटनेची वेळ येऊन ठेपली होती. मराठी माणूस पुरता कातावून गेला होता. आतल्या आत धुमसत होता. वातावरण तापलं होतं, मराठी माणसाला मन्वंतराचे वेध लागले होते आणि राजकारण अशा दिशेने चाललं होतं की मराठी माणसांच्या संघटनेशिवाय चालण्यासारखं नव्हतं किंबहुना ती काळाची गरज होती.

आणि १९ जून १९६६ रोजी जन्म झाला एका सेनेचा… शिवसेनेचा… शिवसेना म्हणजे शिवाजीची सेना. छ्त्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनेचं आराध्य दैवत. महाराज भवानी मातेचे फार मोठे अन्‌ प्रखर भक्‍त. ‘वाघ’ हे आई भवानीचं वाहन. म्हणून शिवसेनेचं बोध-चिन्ह वाघं असावं असं बाळासाहेबांच्या मनांत आलं. वाघ म्हणजे रुबाब, मस्ती अन्‌ आक्रमकपणा. शिवसेनेचा सार व्यक्‍त होणार्‍या बोधचिन्हाला साकारले खुद्‍द बाळासाहेबांनीच!

३० ऑक्टोबर १९६६ रोजी महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्फूर्तिदायक चरणांवर प्रतिज्ञेचा माथा ठेऊन, महाराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी सिद्ध झालेल्या शिवसेना सैनिकांचा पहिला मेळावा शिवतीर्थावर आयोजित करण्यात आला. दृष्ट लागवी असा स्थापना मेळावा झाला. शिवाजी पार्क खच्चून भरलेल,रस्ते तुंबले,गल्ल्या भरल्या. ‘मार्मिक’ वगळता इतर कोणत्याही वर्तमानपत्रात सेनेच्या शुभारंभाच्या मेळाव्याची घोषणा अथवा जाहिरात नव्ह्ती. तरीही, मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अन्य भागांतून मेळाव्याला भरघोस प्रतीसाद मिळाला. चैतन्यमय आणि संघर्षशील…. असे होते शिवसेनेचे सुरुवातीचे दिवस. पहिली सभा दणक्यात झाली. मराठी तरुणांचे तांडे ७७-ए ,रानडे रोडकडे वळू लागले. ‘मार्मिक’ वर वाचकांच्या उड्या पडत होत्या. बाळासाहेबांच्या वाणीला आणि शब्दांना एक वेगळीच धार चढत होती. व्यायामशाळा,स्थानिक क्रिडासंस्था अन्‌ गणपती-गोविंदा मंडळं यांच्या मदतीने सेनेचं ‘नेटवर्किंग’ जोरात सुरु होतं. मराठी माणसांच हक्काचं माहेरघर म्हणून शिवसेनेची घोडदौड सुरु झाली.

बाळासाहेब-शिवसेना म्हणजे राजकिय अविष्कार, हिंदुत्वाचा झंझावात, शिवसेना म्हणजे घटनांची रेलचेल, अनंत आंदोलने, असंख्य जाहीर सभा, मेळावे, शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरेंचा करिश्मा, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचा कणखर बाणा, शिवसेनेच्या कुटुंबाचा एकोपा, शिवसैनिकांची निष्ठा, मराठी माणसांचा विश्वास…हीच आपली शिवसेना…एक भगवा झंझावात! शिवसेनेचा मराठी माणसाशी असणारा संबंध अतूट राहिला आहे. इतक्या वर्षांत तीन पिढ्या तरूण होऊन गेल्या. येणारी प्रत्येक पिढी नव्याने इमान घेऊन शिवसेनेत सामील होत आहे.

या भगव्या झंझावातास थांबविण्याची ताकद कोणाकडेही नाही. कारण ही भगव्या तुफानीची आगेकूच म्हणजेच आहे हिंदुत्वाची आगेकूच, मराठी माणसाची आगेकूच
शिवसेना पक्ष : ध्येय
- आम्ही हिंदुस्थानी आहोत म्हणुन हिंदुत्व हा आमच्या पक्षाचा मुख्य पाया आहे.
- ह्या राष्ट्राच्या विरोधात असणाऱ्यांशी शिवसेनेची लढाई ही अखंड चालू राहील.
- स्वत:च्या हक्कासाठी उभारणीसाठी शिवसेना नेहमी प्रोत्साहन देईल.
- समाजसेवा व सामाजिक ऎक्य हेच समाज विकासाचे मार्ग आहेत असा शिवसेनेचा ठाम विश्वास आहे म्हणुन सक्रीय राजकारणापेक्षा जास्त सामाजिक चळवळीवर शिवसेनेचा अधिक भर आहे.
- धर्म, जात व भाषा ह्यामधल्या किरकोळ मतभेदांवर शिवसेनेचा बिलकुल विश्वास नाही. उलट ह्याला कुणीही बळी पडू नये अशीच शिवसेनेची शिकवणूक आहे.
- राज्याच्या अधिकृत भाषेमध्ये तरुणांना शिक्षण मिळावयास हवे.

शिवसेना पक्ष : धोरणे
- मातृभूमिबद्दल असलेल्या जबाबदाऱ्या व कर्तव्य ह्याची जाणीव असलेला शक्‍तिमान, ताठ मानेने चालणारा तसेच सुसंकृत तरुण उभा करणे.
- मातृभूमिसाठी केव्हाही कसलाही त्याग करावयास तयार असलेली एक शक्तिशाली संघटना निर्माण करणे.
- समाजविघातक, राष्ट्रविघातक शक्‍तिविरुध्द तसेच भ्रष्टाचार, अयोग्य व लालफितीत अडकलेले प्रशासनाच्या विरोधात ठामपणे मुकाबला करण्याची एक जाणीव समाजामध्ये निर्माण करणे.
- राजकारण वा सत्ता नव्हे तर समाजसेवा हेच अंतीम ध्येय आहे, अशी भावना समाजात निर्माण करणे.
- समाजविघातक, राष्ट्रविघातक शक्‍तिविरुध्द तसेच भ्रष्टाचार, अयोग्य व लालफितीत अडकलेले प्रशासनाच्या विरोधात ठामपणे मुकाबला करण्याची एक जाणीव समाजामध्ये निर्माण करणे.
- युवापीढीमधील नैराश्य हटवून त्याच्या मनामध्ये असा आत्मविश्वास निर्माण करणे की ते बेकारी, अशिक्षीतपणा व गरीबीविरुध्द लढा देउ शकतील. त्याना शिक्षण व विविध क्षेत्रात प्रशिक्षण देणे.
- राष्ट्रीय हितसंबंध जपणे, कायद्याला मान देणे व संपूर्ण राष्ट्रासाठी सक्रीय सामाजिक कायदा असावा ह्याबद्दल आग्रही असणे.
- समाजामध्ये बंधुत्व, एकसंधपणा व सुसंवाद प्रस्थापीत करणे.

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL