Gajanan Kirtikar

Go to English Version

विमा कर्मचारी सेनेचे अधिवेशन

दिनांक 15-06-2013

शिवसेना प्रणित भारतीय विमा कर्मचारी सेनेचे तिसरे अखिल भारतीय त्रैवार्षिक अधिवेशन आजपासून नाशिकमध्ये होत आहे. दोन दिवसाय या अधिवेशनाला राज्यभरातील पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित राहणार आहेत.

शनिवारी संध्याकाळी सात वाजता दादासाहेब फाळके स्मारकाच्या ठिकाणी अधिवेशनाचे उद्‌घाटन होणार आहे. यावेळी भारतीय विमा कर्मचारी सेनेचे अध्यक्ष सुधीर जोशी, स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष गजानन किर्तीकर, विमा सेनेचे सरचिटणीस अनिल देसाई, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, एलआयसीचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक सुधाकर जोसी आदि उपस्थित राहणार आहेत. उदघाटनानंतर हे सर्व जण मार्गदर्शन करणार आहेत.

रविवार सकाळी दहा ते दुपार एक या वेळेत वेतनवाढ, भरती आणि विमा क्षेत्राचे खासगीकरण या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तर, दुपारी दोन ते चार या वेळेत सेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आणि घोषणा होणार आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता बेस्टचे माजी चेअरमन सुनिल शिंदे यांच्या उपस्थितीत अधिवेशनाचा समारोप होणार आहे. तरी, अधिवेशनाला उपस्थित रहावे, असे आवाहन विभागीय अध्यक्ष नितीन विखार यांनी केले आहे.

[ मागे जा ]

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL