Gajanan Kirtikar

Go to English Version

रेल्वे समस्या निवारणासाठी खासदार गजानन कीर्तिकर यांचा पाहणी दौरा

6

सोमवार, दिनांक ३० मे २०१६ रोजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी आयोजित केलेल्या २७ उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्रांतर्गत रेल्वे परिसरातील नाल्यांची पावसाळ्यापूर्वी सफाई पाहणी करण्यासाठी, ओशिवरा स्थानक व अंधेरी ते गोरेगाव हार्बर प्रकल्पाची सद्यपरिस्थिती अवगत करण्यासाठी रेल्वेचे संबंधित अधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यासोबत बैठक पार पडली.

सदर बैठकीस खासदार गजानन कीर्तिकर यांच्यासोबत रेल्वेचे ADRM श्री. शैलेश गुप्ता, श्री. तुषार मिश्रा Sr. DE (South), श्री. ए. के. मिश्रा Sr. Section Engineer तसेच शिवसेनेचे पदाधिकारी महिला विभाग संघटक सौ. राजुल पटेल, नगरसेवक बाळा नर, उपविभाग प्रमुख सुनिल भागडे, राजेश शेट्ये, राजू पेडणेकर, विष्णू कोरगावकर, शशांक कामत, महिला विधानसभा संघटक सौ. स्नेहल गोलतकर, म. उपविभाग संघटक सौ. पुनम वैद्य, शाखाप्रमुख लक्ष्मण नेहरकर, अजित भोगले, अमर मालवणकर, हरुन खान, म. शाखा संघटक सौ. रोहिणी साळवी, सौ. रंजना नावगे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

खासदारांचे स्विय सचीव श्री. प्रसाद जोशी यांनी बैठकीत येणार्‍या विषयांबाबत प्रस्तावना केली. खासदार साहेबांनी रेल्वे हद्दीतील नाले सफाईबाबत विचारले असता उपस्थित रेल्वे अधिकारी ADRM शैलेश गुप्ता व Sr. Div. Engg. श्री. तुषार मिश्रा यांनी असे सांगितले की रेल्वेच्या हद्दीतील  नाले सफाई योग्य प्रकारे चालू आहे. २५ मे पासून मनपा बरोबर एकत्र  परिक्षण करुन नालेसपाईचे काम सुरु केले आहे. ते काम ५ जुनपर्यंत पुर्ण होईल, असे आश्वासन रेल्वे तर्फे देण्यात आले. तेव्हा कामाची तपासणी त्या त्या विभागातील पदाधिकार्‍यांनी १० जूनला काम झाल्याची खात्री करावी असे खासदार गजानन कीर्तिकर यांनी सूचना दिली.

शाखाप्रमुख हरुन खान यांनी अंधेरी भुयारी मार्ग येथील नालेसफाईबाबत प्रश्न उपस्थित केला असता तेथेही काम सुरु असून तेही ५ जून पर्यंत पूर्ण होईल त्याची खात्री हरुन खान यांनी १० जूनपर्यंत करावी असे सुचवण्यात आले. शाखाप्रमुख अजित भोगले यांनी सांगितले की, रेल्वे वसाहतीच्या बाजूला जे नाले आहेत त्यांच्या काठावर जे रॅबीट पडले आहे ते पावसाळ्यात नाल्यात जाऊन साचू शकते. त्यामुळे लवकरात लवकर साफ करावे त्यावर उपस्थित शाखाप्रमुख अजित भोगले यांच्या सूचनेनुसार मा. खासदारांनी सिमेंट गोडाऊनमुळे होणार्‍या समस्येबाबत कायमचा उपाय योजना करण्यासंबंधी रेल्वे प्रशासनाला सुचना केली.

उपविभागप्रमुख श्री. सुनिल भागडे यांनी असे सांगितले की पार्ले बिस्किटजवळील नाला साफ झाला नाही तेव्हा उपस्थित रेल्वे अधिकार्‍यांनी असे सांगितले की तेथे रेल्वे रुळाखालील नाला साफ केला आहे व मनपाचे काम चालू आहे त्याची खात्री पदाधिकार्‍यांनी १० जूनला खात्री करावी.

शाखाप्रमुख लक्ष्मण नेहरकर यांनी सांगितले की वालभट नदीखालील रेल्वे पुलाखाली कचरा साचतो व त्याला आग लागते त्यामुळे लगतच्या झोपडपट्टीला आग लागण्याची स्थिती उपस्थित होऊ शकते व त्या पुलाखालील आगीमुळे रेल्वे सेवाही विस्कळीत होते. त्याचे कारण थर्माकोल कारखाना व इतर लघुउद्योगांमुळे कचरा साचतो. यासंदर्भात – प्रदुषण नियंत्रण बोर्डाला रेल्वेने पत्रव्यवहार करावा व खासदार कार्यालयसुध्दा यासाठी पाठपुरावा करेल असे ठरले. मालाड व गोरेगाव रेल्वेच्या पादचारी भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी भरते त्यामुळे लोकं रेल्वे रुळ पार करतात व अपघात होतात, तरी तेथे पंप लावून पाणी काढणार्‍या हाऊस किपींग कंत्राटदाराला रेल्वे प्रशासनाने विशेष आदेश द्यावेत असे श्री प्रसाद जोशी यांनी सुचविले. जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान तयार असलेले व अद्याप सुरु न झालेले ओशिवरा रेल्वे स्थानकास सुरु होण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईबाबत विचारले असता M.R.V.C.  ची थोडी कामे बाकी असून हे स्थानक नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंत सुरु होईल असे आश्वासन रेल्वे अधिकार्‍यांनी दिले. ओशिवरा रेल्वे स्थानकाला ‘राममंदीर रोड’ असे नाव देण्यात यावे यासाठी केंद्रीय गृहमंत्री व रेल्वेमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत प्रस्ताव राज्यशासनाकडे व त्यांचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठवावा अशी पद्धत आहे. त्या अनुषंगाने D.R.M. कार्यालयातर्फे सुद्धा असा प्रस्ताव केंद्र शासनास देण्यात यावा असे सुचविण्यात आले व त्यांनी ते मान्य केले.

हार्बर लाईन विस्तार करताना प्रकल्पबाधित लोकांना हक्काची घरे मिळणे पर्याप्त आहे. पटेल इस्टेट येथील तीन दुकान तिथे उपलब्ध असलेल्या मनपाच्या भूखंडावर बांधून द्यावीत तसेच सहाव्या लाईनसाठी जागा ताब्यात घेण्याचे कामसुध्दा सुरु आहे पैकी अंधेरी ते पार्ले दरम्यान २८ खोल्यांची चाळ आहे. त्यांना निष्कांशन करण्याची वारंवार धमकी देण्यात येते त्यांना त्यांची कागदपत्रे तपासून प्रकल्पबाधित ठरवून त्यांचे पुनर्वसन करावे. त्यावेळेस जोगेश्वरी येथील नागरीकांनी जोगेश्वरी लेवल सुरु करण्याची मागणी केली परंतु काही तांत्रिक बाबींमुळे ते शक्य नसल्याचे रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले. परंतु राममंदीर रोड रेल्वेस्थानक सुरु झाल्यास तसा प्रयत्न करता येईल असे सांगितले.

जोगेश्वरी इंदिरा नगर येथील रेल्वेवसाहतीतील संरक्षण भिंत एक गेट बनविणे गरजेचे आहे तेव्हा परिक्षण करुन त्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे रेल्वेअधिकार्‍यांनी सांगितले. जवाहर नगर रेल्वे फाटक येथील ८ वी लाईन टाकण्यासाठी प्रकल्पबाधित झालेल्या घरांना शिफ्टींग लेटर मिळाले आहे परंतु अजूनही घर मिळाले नाही त्याबद्दल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आला. रेल्वे हद्दीतील झाडांची छाटणी महानगरपालिकेतर्फे केली जाते त्यासाठी सेक्शन इंजिनीयर बोरीवली (कप्तान सिंह) यांना मनपाकडे आगावू रकमेचा भरणा करावा असे सुचवण्यात आले.

सर्वच रेल्वेस्टेशनवर सरकते जीने बसविण्यात येणार आहेत. पटेल इस्टेट रोड FOB जवळ पुर्व व पश्चिम तिकीट बुकींग खाली बसविण्यात यावे. जोगेश्वरी व सर्वच स्तानकांवरील छत वाढविण्याचा प्रस्ताव तयार असून मंजूर झाला आहे. त्यासाठी १० कोटी रुपये निधी मंजूर व्हावा असे केंद्रीय मंत्रालयाकडून मागण्यात आला आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड येथील रेल्वे फलाटांवर योग्य ठिकाणी शौचालयांची जागा निश्चित करण्यात यावी. उपविभागप्रमुख राजेश शेट्ये यांनी असे सुचविले की प्रत्येक रेल्वे स्थानकांवर पूर्वीप्रमाणे बाहेर गावी जाणार्‍या गाड्यांसाठी करंट तिकीट मिळाले पाहिजे व बाहेरगावी जाणार्‍या सर्व गाड्यांना अंधेरी येथे थांबा देण्यात यावा याबाबत प्रस्ताव तयार करावा असे सुचविण्यात आले.

नगरसेवक बाळा नर यांनी असे सुचविले की जोगेश्वरी पूर्व नवळकर मार्केटलगत असलेल्या नाल्याला रेल्वेकडील बाजूने संरक्षक भिंत नाही तरी ती भिंत बांधल्यास रेल्वेच्या हद्दीतील कचरा सदरच्या नाल्यात जाणार नाही यावर परिक्षण करुन कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन रेल्वे अधिकार्‍यांनी दिले.

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL