Gajanan Kirtikar

Go to English Version

प्रबोधन गोरेगावच्या प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या नवीन वास्तुचे भव्य उद्घायटन

दिनांक 10-04-2013

अभ्यासिका ही उच्च शिक्षण घेण्यार्या् विद्यार्थ्यांची मुळ गरज असुन येथे मोफत वर्तमानपत्र वाचन सुविधा, इंटरनेट सुविधा, इ. अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेतग्रंथैव गुरु’ म्हणजेच ‘ग्रंथ हेच गुरु’ ह्या मराठीतील उक्तीिप्रमाणे पुस्तके हे सर्वश्रेष्ठ शिक्षक आहेत. हे वाचनालय सर्व सुविधांनी युक्त) असुन येथील कर्मचारी वर्ग अतिशय कार्यतत्पर आहे. मराठी साहित्याप्रमाणेच येथे इंग्रजी व हिंदी पुस्तकेही उपलब्ध आहेत. तुमचा रस जरी कला, संस्कृती, साहित्य, सामजिक शास्त्रे, इतिहास यापैकी कशामध्येही असला तरी या सर्व विषयांवरील विपुल पुस्तके येथे उपलब्ध आहेत. तसेच व्यावसायिकांसाठी आमच्या इथे अर्थशास्त्र, अभियांत्रिकी, माहिती- तंत्रज्ञान, कायदा, व्यवस्थापन, औषधशास्त्र व विज्ञान यांवरही अनेकविध पुस्तके उपलब्ध आहेत. पुस्तकांप्रमाणे येथे विविध वर्तमानपत्रे तसेच नियतकालीके उपलब्ध असतात. येथे वाचकांना अतिशय कार्यक्षम सेवा पुरवणारी स्वयंचलित संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) उपलब्ध आहे.

[ मागे जा ]

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL