Gajanan Kirtikar

Go to English Version

पूरग्रस्तांना धान्यवाटप व मदत

26 जुलै 2005 मुंबईकरांसाठी एक काळा दिवस! अतिवृष्टीमुळे संपूर्ण मुंबईज्ञार संकट ओढवले. त्यातही पश्चिम उपनगरांना पुराचा अधिक फटका बसला. प्रत्येकाचेच नुकसान झाले होते. तरीही मुंबईकर हतबल झाले नाहीत. त्यांनी एकमेकांना साहाय्य करून परिस्थितीला तोंड दिले आणि माणुसकीचे जे दर्शन घडविले त्याला तोंड नाही. माझ्या मतदारसंघात तर करोडो रुपयांचे नुकसान झाले. अनेक घरांचे पडझड झाली. काही तर जमीनदस्त झाली. तबेल्यातील म्हशी तबेल्यातच मरुन पडल्या. सगळे दृश्य भीषण आणि भयाण होते. समोर उभ्या ठाकलेल्या मृत्यूच्या दर्शनाने काहीजण हबकले होते. अनेक दुर्दैवी प्राणी प्राणास मुकले होते. तरीही प्रत्येकडण एकमेकांना आधार देत सावरत होता. अशा वेळी सरकारी यंत्रणा नेहमीप्रमाणे कूर्मगतीने मदतकार्य करीत होती. प्रथम पाहणी अहवाल, मग प्रस्ताव, मंजुरी या नेहमीच्याच शिरस्त्यात अडकून पडली होती. पण शिवसेना सर्वप्रथम मुंबईकरांच्या मदतीसाठी धावून गेली. अनेक ठिकाणी मी स्वतः फिरून सरकारी मदतीशिवाय अन्नधान्य, वह्या, औषधे, अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले. सरकारी गलथानपणामुळे व भ्रष्टाचारामुळे कितीतरी पूरग्रस्त विभागांना मदत मिळालीच नाही. तर कोणतेही नुकसान न होता काही भागातील नागरिकांना सर्व प्रकारची मदत सहज मिळत होती. पूरग्रस्तांसाठी सरकारदरबारी पाठपुरावा करून त्यांना सरकारी मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केले. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे सांत्वन केले आणि शक्य ती मदत करून दुःख निवारण्याचा प्रयत्न केला.

[ मागे जा ]

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL