Gajanan Kirtikar

Go to English Version

दिंडोशी अग्निशमन केंद्र

अंधेरी ते दहिसर या पश्चिम रेल्वेच्या पूर्व भागात गेल्या 20 वर्षात औद्योगित वसाहती वाढल्या आहेत. दिंडोशी, पिंपरीपाडा, गोकुळधाम, नागरी निवारा, म्हाडा संकुल या विभागात मोठया संख्येने उत्तुंग इमारती आणि नागरी संकुले विकसित झाली. लोकवस्ती वाढली तरी त्या प्रमाणात अग्निशमन केंद्रे न झाल्यामुळे आपत्तीच्या प्रसंगी मदतकार्याला विलंब होत होता. सगळया अडचणींवर मात करून 14 फेब्रुवारी 2001 रोजी मुंबई महानगरपालिकेने म्हाडाकडून भूखंडाचा ताबा मिळविला. स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यांनी अग्निशमन केंद्राच्या उभारणीसाठी स्थायी समितीमध्ये 50 लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली. 13 जून 2006 रोजी तत्कालीन महापौर श्री. दत्ता दळवी यांच्या हस्ते दिंडोशीच्या अग्निशमन केंद्राचा उद्धाटन सोहळा संपन्न झाला.

[ मागे जा ]

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL