Gajanan Kirtikar

Go to English Version

झोपडपट्टीतील जनतेसाठी शिक्षण संस्था

दि. 10 मे 1990 रोजी ‘सांदीपनी विद्या निकेतन’ या संस्थेची स्थापना केली. 23 जून 1990 रोजी प्रथम पाच विद्यार्थ्यांना घेऊन ‘महाराणी सईबाई विद्यामंदिर’ या शाळेचा ‘पूर्व प्राथमिक’ विभाग सुरु करून शिक्षणक्षेत्रात पदार्पण केले. आज या शाळेची वटवृक्षासारखी वाढ झाली असून शाळेच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक विभागात एकूण 1600 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विभागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने आजच्या 21व्या शतकात यशस्वी झेप घेण्यासाठी, तांत्रिक व व्यवसायाभिमुख शिक्षण विभागातील माझ्या मतदारांच्या मुलांना देण्यासाठी या शाळेत सेमी इंग्रजी व्यवसायाभिमुख शिक्षण सुरु करण्याचा माझा मनोदय आहे.

[ मागे जा ]

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL