Gajanan Kirtikar

Go to English Version

आरे भास्कर

माहिती तंत्रज्ञानातील प्रगती आणि जागतिकीकरण यामुळे माणसांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला आहे. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात नातीगोती केवळ नावापुरती राहिली आहेत. मातीशी असलेला आपला ॠणानुबंध सैल झाला आहे. संस्कृती, परंपरेची वीण विस्कटल्यासारखी वाटते. निसर्गाच्या सहवासात आणि सान्निध्यात ही वीण घट्ट होईल, ॠणानुबंध जपले जातील या विचाराने 1999 साली माझ्या मनात एका संस्थेने आकार घेतला. आरे उपनगरात फिरताना पानांच्या जाळीतून वाट काढीत माझ्यापर्यंत आलेल्या सूर्यकिरणआंनी माझ्या मनात एक लहर निर्माण केली. भास्कराच्या किरणस्पर्शाने अवघी धरतीच चैतन्यमय होऊन जाते. मग समाजाला सचेत करण्यासाठी निर्माण करीत असलेल्या संस्थेला सूर्याशी का जोडू नये? विचार प्रबळ झाला आणि संस्थेचे नाव निश्चित झाले ‘आरे भास्कर’.

1999 साली स्थापन झालेल्या आरे भास्करने धडाक्याने कामाला सुरुवात केली आहे. संस्थेतर्फे नियमितपणे वृक्षारोपण केले जाते. संस्था मिनी मॅरेथॉनचे आयोजन करते. क्रीडाविकासासाठी दरवर्षी वेगवेगळया वयोगटातील मुलांसाठी क्रीडाप्रशिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात येतो. जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड भागातील अनेक विद्यार्थ्यांना या शिबिराचा लाभ मिळतो. अन्य संस्थांच्या कार्यक्रमांना आणि स्पर्धांना ‘आरे भास्कर’ नेहमीच मदत करीत असते. परिसरातील जनतेसाठी ‘आरे भास्कर’ने अद्ययावत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली आहे.अशा या आगळया उद्यानाचा लोकार्पण सोहळा शिवसेना कार्याध्यक्ष माननीय श्री. उध्दवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते दि. 19 ऑगस्त 2008 रोजी संपन्न झाला. 18 वर्षे आमदार म्हणून काम करीत असताना आपल्या कारकिर्दीत जनहिताच्या दृष्टीने कायमस्वरुपी उपयुक्त अशी सुविधा उपलब्ध करून द्यावी, या उद्देशाने निर्माण केलेल्या ‘आरे भास्कर’ मनोरंजन उद्यानाची निर्मिती पूर्ण झाल्याचा मला विशेष आनंद वाटतो.

[ मागे जा ]

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL