Gajanan Kirtikar

Go to English Version

आरे कॉलनी दफनभूमीचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी निदर्शने

दिनांक 14-06-2013

आरे कॉलनीत दफनभूमी बांधण्याचा घाट सरकार घलत असल्याचा आरोप करतानाच प्रस्तावित दफनभूमीच्या विरोधात आमदार गजानन किर्तीकर व सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी रविवारी गोरेगाव पूर्वेकडील चेकनाक्यावर जोरदार निदर्शने केली.

दफनभूमीचा प्रस्ताव रद्द करावा, या मागणीसाठी १५ ते २१ जून या कालावधती स्वाभरी मोहीम राबवण्यात येणार आहे. तर २२ जून रोजी आरे दुग्ध वसाहतीतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. १९९३ साली मंुबईचा विकास आराखडा निश्चित झाला. आरे दुग्ध वसाहतीची महती, लगतचे साईबाबा संकुल, दूधसागर सोसायटी, नित्यानंद नगर, आरे युनिट क्रमांक ८ या नागरी वसाहती लक्षात घेता, ना विकास क्षेत्र व हरित पट्टा म्हणून आरक्षण निश्चित करण्यात आले. या परिसरात मुस्लिम लोकसंख्य नगण्य असताना व दफनभूमीची गरज नसतानाही सरकार दफनभूमीचासाठी आरक्षणात बदल करत आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे. रविवारी झालेल्या निदर्शनात विभागप्रमुख विनोद घोसाळकर, महिला संघटक साधना माने, स्थायी समिती अध्यक्ष रवींद वायकर यांच्यासह अनेक नगरसेवक व शिवसैनिक सहभागी झाले होते

[ मागे जा ]

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL