Gajanan Kirtikar

Go to English Version

आरे कॉलनीमध्ये विद्युत पुरवठा

गोरेगावच्या पूर्वेकडील आरे दुग्धवसाहतीत आदिवासी आणि अन्य कुटुंबे अनेक वर्षांपासून पारंपारिक पध्दतीने राहत होती. स्वातंत्र्याला पन्नास वर्षे होत आली तरीही त्या वस्तीत वीज पोचली नव्हती. त्या झोपडपट्टीच्या चारही बाजूला उत्तुंग इमारती उभ्या राहिल्या, त्या विद्युत रोषनाईने झगमगु लागल्या. मात्र आरे कॉलनीत वास्तव करणाऱ्या, आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील गरीब कुटुंबांच्या जीवनात अंधकारच होता. ही गोष्ट मनाला वेदना देणारी होती. आरे प्रशासनाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे झोपडपट्टीवासीयांना विद्युत जोडण्या दिल्या जात नव्हत्या. त्यांना विद्युतपुरवठा व्हावा यासाठी माझे प्रयत्न सुरुच होते.

1995 साली शिवशाहीचे सरकार आले आणि अनेक लोकहिताची कामे मार्गी लागली. मुख्यमंत्री मनोहर जोशी ‘आरे कॉलनीमधील झोपडपट्टयांना वीज नाही’ ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणली. ‘झोपडपट्टीवासीयांच्या घरांना लवकरात लवकर विद्युतपुरवठा केला जाईल’ असे आश्वासन माननीय बाळासाहेबांनी सभेत दिली. ताबडतोब चव्रेच् फिरली. विद्युतपुरवठयाबाबत उच्चस्तरीय बैठका होऊ लागल्या. आरे प्रशासनाने विद्युतपुरवठा करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले आणि 1997 साली अनेक वर्षे अंधारात असणाऱ्या आरे कॉलनीमधील 3500 झोपडयात वीज आली. झोपडपट्टीवासीयांचे जीवन उजळून निघाले. तसेच संतोष नगरही प्रकाशमय केले.

[ मागे जा ]

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL